Posts

Showing posts from July, 2025

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

Image
नवीन ट्रेक, नवीन मित्र... आणि निसर्गाच्या कुशीत हरवलेली एक अविस्मरणीय भटकंती! आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. कात्रज बोगद्यापासून सुरू झालेली ही वाट – सिंहगडपर्यंत – केवळ चाल नाही, तर एक जिवंत अनुभव होता! अनेक डोंगर-टेकड्या, खिंडी, चढ-उतारांचा प्रवास, जवळपास १५-१६ किलोमीटरची पायपीट आणि तब्बल ५-६ तासांची भटकंतीने थकवा येईल असे वाटले तरी अनुभव मात्र थकवणारा नव्हता, तर उलट उत्साहवर्धक ठरला. डोंगररांगेवर चढताना एका बाजूला गजबजलेले पुणे शहर आणि दुसऱ्या बाजूला शांत, निळसर-हिरवट रंगांनी नटलेला निसर्ग — मनाला एक वेगळीच शांती देत होता. मध्येच कोवळं ऊन, मधूनच पावसाच्या सरी, तर काही वेळा ढगांची साऊली — निसर्गानेही जणु या भटकंतीला सोबत करत होता. ट्रेक दरम्यान वरून बघताना सिंहगड किल्ला ढगांत लपलेला दिसत होता. त्याच्या टोकावरचा टॉवर जणू आपल्याला खुणावत होता – “चला, थोडं अजून…!” सिंहगडाचे हे खुनावणे आम्हाला थांबू देत नव्हती. सिंहगडापर्यंत पोहचण्याची उर्जा त्याच्याच असण्यातून मिळत होती. राकेश पाटील मागे परदेशी सर, आणि मधून मधून एकमेकांना प्रोत्साहन देणारे सर्व सहकारी...

प्रेम, कायदा आणि बालकांची सुरक्षा — एक संवेदनशील दृष्टिकोन

Image
प्रेम ही मानवी भावना आहे – कोमल, निरागस, पण ती व्यक्त करताना समोरच्याच्या भावना, वय, सामाजिक स्थळ, आणि कायदेशीर सीमा यांची जाणीव ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः जेव्हा गोष्ट अल्पवयीन मुलांशी संबंधित असते, तेव्हा ही संवेदनशीलता अधिक गहिरी आणि जबाबदारीची असते. भारत सरकारने २०१२ साली लागू केलेला POCSO (Protection of Children from Sexual Offences) Act याच भावनेतून प्रेरित आहे – बालकांची शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक सुरक्षितताही अबाधित राहावी यासाठी. अलीकडील एका न्यायालयीन प्रकरणात, ३५ वर्षीय पुरुषाने १७ वर्षीय मुलीचा हात धरून “I love you” म्हटल्यावर, न्यायालयाने त्यात लैंगिक हेतू आढळत नाही म्हणून आरोपी निर्दोष ठरवला. या निर्णयावर समाजात चर्चा सुरू झाली – आणि ती चर्चा चांगली आहे, कारण ती आपल्याला आपली भूमिका, मूल्यं आणि जबाबदारी पुन्हा तपासायला भाग पाडते. काय आहेघटनाक्रम? या प्रकरणात, आरोपीने एका अल्पवयीन मुलीशी फक्त एकदाच संवाद साधला – तोही "I love you" असं म्हणून. या कृतीत कोणताही अश्लील स्पर्श, पाठलाग, धमकी किंवा शारीरिक अत्याचार नव्हता. यावरून न्यायालयाने निष्कर्ष ...