Posts

Showing posts from 2021

वाचनातून भेटलेली माणसं

              "प्रश्न पुरुषभानाचे" हे पुस्तक वाचलं. गेल्या अनेक वर्षे चळवळीत काम करतो आहे. पण हे पुस्तक वाचलं आणि नव्याने खूप काही गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. लिंगभाव आणि संवेदनशीलता या विषयाचा अभ्यास आणि त्यानुसार आपलं जगणं घडवावं अस मला नेहमी वाटतं. समाज अजूनही स्त्री आणि पुरुष त्यांच्या अस्तित्वाला घेऊन अजूनही खूप एकांगी आहे. सामाज व्यवस्थेने अगदी सुरुवातीपासून तशी व्यवस्था पद्धतशीरपणे सुरू ठेवली आहे. माझा चळवळीशी संपर्क आल्यापासून या विषयावर काम करणाऱ्या खूप मित्र मैत्रिणींचा सहवास लाभला. हळूहळू या विषयावरचा संवाद आणि वाचन केलं. काही संकल्पना समजत गेल्या, त्या वैयक्तिक जीवनात त्यांचा अंमल करताना मात्र नातेसंबंधातून खूपदा टीकाही झाली, नावं ठेवली गेली, बिघडला आहे वगैरे वगैरे....  मला पुरुष म्हणून घडताना आजपर्यंत समाजाने शिकवलेल्या पारंपरिक मूल्यांचा विरोध करताना खूप अडचणी आल्या. पण जे मूल्ये स्त्री आणि पुरुषांना समान संधीची आणि दर्जाची समानता उपभोगण्याचा अवसर देईल असे मूल्ये मनात अगदी स्पष्ट झाल्याने मी मला बोलणाऱ्यांचा फारसा त्रास करून घेतला ...

जरा विचार तर करू...

   आजही देशात अनेक समस्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची मानसिकता हलकी होत चालली आहे. म्हणून समाजात मानसिकता बदलण्यासाठी काम करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही प्रश्न असो त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येईल की, वाईट मानसिकतेतूनच हे सर्व प्रकार घडत आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर हिंसेचे प्रमाण वाढत चालले आहे. ही हिंसा थांबविण्यासाठी अनेक अंगाने मानसिकता बदलासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनेक पैलू समजून घेऊन समाजात चर्चा आणि संवाद व्हायला हवा.       गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार, छेडछाड हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे इतक्यावरच थांबत नाही तर बलात्कारानंतर अगदी क्रूर पध्दतीने खून देखील होत आहेत. हे चित्र फार त्रासदायक आहे. असे अमानुष प्रकार कोणताही हंगाम पाहून होत नाही तर कोणत्याही काळात हे प्रकार घडू शकतात. लॉकडाऊनच्या काळात देखील असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी आजपर्यंत काय झाले?  कँडल मार्च, आंदोलन, मोर्चे, निवेदन... पण पुढे काय?  या सगळ्यात पिडीत व्यक्तीला खरंच न्याय भेटला का?  हे प्रश्न अ...

भारत_देश_सार्वभौम_आहे

#भारत_देश_सार्वभौम_आहे.  आपला भारत देश हा #सार्वभौम आहे. म्हणजेच आपल्या देशावर कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत शक्तीच वर्चस्व नसणे. मग एक व्यक्तीच असो, संस्थेचं असो, संघटनेचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, जातीचे असो किंवा पक्षाचे असो असे अश्या कोणत्याही एका शक्तीच वर्चस्व नसणे म्हणजे #सार्वभौम असणे. त्यामुळे भारत देशात किंवा महाराष्ट्रात सरकारमध्ये कोणताही पक्ष निवडून गेला तर त्याची ओळख पक्ष न राहता संबंधित राज्याचे सरकार म्हणून होते.  खर तर केंद्रातील सरकारला मोदी सरकार हे नाव मेडियाने दिल आहे. आणि त्याचा इतका प्रभाव सामान्य जनतेवरच नाही तर आपल्यासारख्या परिवर्तनवादी लोकांवरही तो झाला आहे. आपण *सार्वभौम* भारत घडण्यासाठी सर्वजण लढतो आहे. आपल्या देशाचे सरकार कुना एका व्यक्तीच्या नावाने, संस्थेच्या नावाने, संघटनेच्या नावाने, पक्षाच्या नावाने, धर्माच्या नावाने ओळखले जाणार नाही असं आपलं संविधान म्हणत.  कोणताही मंत्री निवडून आल्यावर शपथ घेताना संविधान व त्यातील मूल्यांच पालन करेल अशी शपथ घेऊनच कारभाराला सुरुवात करतो. म्हणून आपण सर्वांनीच #भारत_सरकार किंवा #केंद्र_सरकार अस म्हणाय...