Posts

Showing posts from June, 2020

आत्महत्या (Suicide)...

Image
आत्महत्या असो की इतर कुठली घटना, लगेचच उलटसुलट चर्चा सुरू होते. प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. मला वाटतं, प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षा आपल्याला प्रश्न पडायला हवे. मुळात अशी घटना का, कुठे, कशामुळे, घडली? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत प्रतिक्रिया टाळायला हवी. आपल्यापर्यंत जी माहिती पोचली ती खरी आहे का? त्या माहितीचा स्रोत काय? माहिती पोचवण्याऱ्या व्यक्तीने जबाबदारीने, संवेदनशीलतेने ती माहिती पोचवली आहे का? असे मूलभूत प्रश्न महत्वाचे आहेत.  गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटना आपण बघत आहोत, याआधीही बघितल्या आहेत. आत्महत्या कुणाची का असेना, शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, सासरच्या त्रासाने त्रस्त सुनेची, इत्यादी. कुठल्याही कारणासाठी का असेना, त्यात एक कॉमन गोष्ट असते. अतीव दुःख, निराशा, संपल्याची भावना, हताश, असहायता, काहीच मार्ग न दिसणं, आहे ही परिस्थिती कधीच बदलणार नाही असा ठाम विश्वास, त्रागा, क्रोध, राग, अस्वस्थता, कुचकामीपणा इत्यादी आणि हे सगळं तीव्र स्वरूपाचं..... खूप त्रास व यातना असतात... आत्महत्या suicide अचानक एका दिवसात instantly घडत नाही दीर्घकालीन त...

बाकी विराज जगतापच्या न्यायासाठी कटिबद्ध राहुयात...

Image
गेल्या काही दिवस सोशल मीडियावर खास करून टिकटॉकसारख्या भिकार माध्यमावर जो काही निचपणा चालला आहे तो थांबला पाहिजे.. कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विभूती लाभलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार घडण अतिशय लज्जास्पद आहे.. प्रबोधनाचा एक मोठा टप्पा अजूनही आपल्याला गाठायचा बाकी आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.. ह्या दोनही महापुरुषांनी स्त्रियांचा सन्मान राखला आहे..मग ती स्त्री कुठल्याही समाजाची असो..एक नवा आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवला असतानाही त्यांच्या मूळ शिकवणीला बाजूला ठेवून काही समाजकंटक #मराठा-बौद्ध असा वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे..ह्या षडयंत्राची कल्पना फार लवकर आम्हाला झाली होती..म्हणूनच सुरवातीला एक पोस्ट आम्ही टाकली होती..जी आज खरी होताना दिसत आहे.   असे प्रयत्न जे कोणी करत असेल त्या (दोन्ही बाजूच्या) नीच प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत... पुन्हा एकदा सजगपणे काम करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांना आवाहन आहे त्यांनी पुढे याव.. आग लावणाऱ्या लोकांपासून समाजाला वाचवाव.. अन्यथा हा...