मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी
सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकतं रायन पिंटो सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे.  १. अबोला- तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे असाल, तर घरी राहणाऱ्या मुलांशी व्हिडीओ कॉल किंवा ...