नात्यातील प्रेम आणि काळजी समजून न घेता नात्याचा होणारा खून
अस्वस्थ अस लहानपणापासून ऐकल होत की आई-वडील मुलांच्या चांगल्यासाठीच धड़पडत असतात, आपल्या मुलांसाठीच जगत असतात. पण आज दोन घटनांनी अस्वस्थ केल आहे. तेलंगानामधील ऑनर किलिंगची घटना ज्यात स्वतःच्या मुलाच आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर येत आहे. आज मुलीच्या सुखापेक्षा जातीधर्माचा अविर्भाव महत्वाचा वाटतो आहे. दूसरी घटना स्वतःच्या 9 वर्षाच्या मूलीवर एक बापच बलात्कार करतो. ही तर बाप नावाच्या पवित्र नात्याला काळींबा फासनारी गोष्ट आहे. कोणत्या नात्यावर विश्वास ठेवावा. एकीकडे आपल्या मुलीने आपल्याला न सांगता तीच्या आयुष्यातील निर्णय घेतला म्हणून ऑनर किलिंगचे प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या लैंगिक इच्छेसाठी स्वतःच्या चिमुरड़या मुलीवरच अत्याचार. ज्या मुलीला प्रेम, लैंगिकक्रीड़ा, आकर्षण यातल काहीही समजत नसतं. तरी देखील त्या इवल्याश्या चिमुरडीला या सगळ्याला समोरे जाव लागल. आज स्री स्वतःच्या कुटुंबातच सुरक्षित नाही.😔😔.. अस सांगितल जात पालकांच मुलांवर प्रेम असतं, म्हणून ते मुलांच्या भल्यासाठीच काही गोष्टीच्या काळजीपोटी त...