Posts

Showing posts from April, 2020

मुलं तणावात आहे कसं ओळखाल?

मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकतं रायन पिंटो सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे. १. अबोला- तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-...

आपण मुलांशी बोलायला शिकू या !

मुलं २-३ वर्षांची होती तेव्हाचं आठवतं. दोघं आपापसात भांडणं करून तक्रारी करायला आली की मी म्हणायची, बघू बरं, माझ्याकडे बघा दोघांनी. कोण खोटं बोलतंय मला डोळ्यात बरोबर दिसतं आणि खरं बोलणारं मूल डोळ्याला डोळा भिडवून पाहू शकायचं. खोटं बोलणारं हसू लागायचं, नाही तर गोरंमोरं व्हायचं. तो झगडा तिथेच मिटायचा. पुढे-पुढे तर आपली बाजूच खरी आहे, हे पटवण्याची घाई असलेलं मूल आपली चिमुकली अंगठ्याजवळची बोटं दोन्ही डोळ्यांच्या खाली ठेऊन, डोळे ताणून मोठे करून म्हणायचं- ‘बघ माझ्या डोळ्यांत. मी खरं बोलतोय.’ हा निरागपणा नंतर मात्र राहत नाही. तो वेगवेगळी रूपं घेत जातो. आता ७-८ वर्षांची मुलं आपली बाजू हिरीरीनं मांडतात. चुकून समजण्यात चूक झाली, त्यांच्यावर आरोप केले तर दुखावतात. कधी कोण खरं कोण खोटं सांगतो आहे, कळेनासं होतं. रुसवे-फुगवे होतात आणि मग मलाच म्हणावंसं वाटतं, खरं-खोटं मला ठरवता येत नाहीय; पण माझ्या डोळ्यांत तुम्हा दोघांविषयी सारखंच प्रेम तरी दिसतंय ना तुम्हाला? रागावू नका बाबांनो ! ही आपलीच मुलं आपल्याला किती गोंधळून टाकतात! लहानपणी वाटतं ही मोठेपणी कशी होणार आहेत, कोडंच पडतं. मोठी झाल्यावर कोडं पडतं...

#माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो

आमचा युवा सहकारी रशिद लिहीतोय! #माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो मी रशिद मणियार...धर्माने मुसलमान. (नाईलाजास्तव धर्म सांगावा लागतोय) माझी सगळी जडणघडण समाजवादी, पुरोगामी चळवळीत झाली. हा वारसा मला माझ्या आजोबांकडून मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी आणि सुफी पंथाच्या शिकवणीचा मी फॉलोवर आहे. त्यामुळे मुल्ला/मौलवींची जहागिरदारी असलेला इस्लाम मला मान्य नाही. मात्र प्रेषित महंमद पैगंबरानी सांगितलेला शांती आणि समतेच्या इस्लामला मी मानतो.. हे सगळं सांगण्याच कारण अस की आज सगळा देश लॉकडाऊन असताना देखील ज्या पद्धतीच्या डिबेट्स देशभर चालताहेत त्या बघून एक सच्चा मुसलमान म्हणून मी व्यथित होतो.. सर्वप्रथम तब्लिगी प्रकरणावर माझी भूमिका मांडावीशी वाटते.. मुळात कोरोनाच इतकं संकट जगभर आणि भारतभर पसरत असताना हा धर्ममेळा आयोजित करण्याची खरच काही गरज होती का?? देशविदेशातील लोकांना आमंत्रण देऊन बोलवायची काही गरज होती का? तर नक्कीच नाही. अस पण सर्वात लाजिरवाणी गोष्ट झाली ती म्हणजे डॉक्टर/पोलीस यांच्यावर थुंकण्याचा घाणेरडा प्रकार काही तब्लिगीनी केला..तो अमानवी आहे..घृणास्पद आहे..जेव्हा मानवतेवरील संकट दूर करण्यासा...