Posts

Showing posts from 2024

जबाबदार नागरिकांचे कर्तव्य

Image
जबाबदार नागरिकांचे कर्तव्य- लैगिंक शोषणात प्रत्येक आरोपीला कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आरोपीला पाठीशी घलनाऱ्यांना देखील तितकीच कडक कायद्याने शिक्षा दाखल झाली पाहिजे. कोणतीही शिक्षा देण्याची एक प्रतिक्रिया असते ते पूर्ण करूनच शिक्षा व्हायला पाहिजे. जर ती प्रक्रिया न पूर्ण होत मारलं जात असेल तर तिथे कायद्या व सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते.  न्यायालयीन प्रक्रियेला महत्व दिले पाहिजे. आरोपी कोणताही असो त्याला गंभीर शिक्षा झाली पाहिजे, पण ती शिक्षा संविधानातील तरतुदीनुसार झाली पाहिजे. आपल्या भारतीय संविधानात सर्व चुकीच्या कृत्यांना शिक्षा आहेत. त्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, अगदी फाशीची शिक्षेची तरतूद देखील आहे. त्याची एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करून ती शिक्षा संबंधित गुन्हेगाराला दिली पाहिजे.  जे लोक कायदा व सुव्यवस्थेला नाव ठेवतात त्यांनी स्वतःला विचारावं की आपण कायदा व सुव्यवस्था काटेकोर होण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा काय योगदान आहे? एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर व सामूहिक पातळीवर काय प्...

बाल संरक्षण: एक आव्हान

Image
आज पुन्हा एकदा बाल संरक्षण हा विषय आपल्या सर्वांसाठी काळजीचा बनला आहे, देशभरातून घडणाऱ्या घटना अगदी मन सुन्न करणाऱ्या आहेत. म्हणून आपण देखील वेळीच आपल्या बालकांच्या सुरक्षेसाठी तयार असायला हवं. *बाल संरक्षण आणि पालकांची भूमिका* या विषयावर आज आपण सर्वांनी आपली समज वाढवली आहे.  बऱ्याच वेळा पालकांना वाटते की आपले बालके सुरक्षित आहेत त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही परंतु आज फक्त मुलीचं नाही तर मुलगे देखील लैगिंक शोषणाचे बळी ठरत आहे. त्यामुळे आज सर्वच पालकांना जागरूक होण्याची गरज आहे. आपल्या बालकांसोबत लैगिंक विषयावर बोलायला बरेचसे पालक नको म्हणतात किंवा त्यांना काय त्याची गरज असे म्हणतात. पण आज जर बालकांसोबतचा संवाद पालकांनी वाढवला नाही तर असे बरेच बालके आहेत ते शोषण सहन करत राहतात पण कुठेही बोलत नाहीत. त्यामुळे आपल्या बालकांसोबत बोला बोलण्यासाठी आवश्यक माहिती नसेल तर ती या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून घ्या. कारण लैगिंक शोषणाचे फार दूरगामी परिणाम बालकांवर होत असतो. म्हणूनच बालकांनासुरक्षित वातावरण निर्माण करणारे ही सर्व मोठ्यांची जबाबदारी आहे. मुलांच्या सोबत क...