Posts

Showing posts from March, 2025

जबाबदारी आणि नैतिकता

Image
समाजात अशांतात पसरेल, समाजा-समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे असंविधानिक आहे. असंविधानिक वागणे किंवा बोलणे ज्यातून शोषण होत असेल, हिंसा होत असेल किंवा द्वेष निर्माण होत असेल तर अश्या व्यक्तीवर कारवाई व्हायलाच हवी. मग ही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो. आणि हे सर्व जर जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून कारवाई व्हायला हवी. मग ही व्यक्ती सरकारमध्ये असो, किंवा कोणत्याही राजकिय पक्षात असो किंवा कोणत्याही सामाजिक संघटनेत / संस्थेत असो किंवा यापैकी कोणत्याही जबाबदार पदावर असो त्या व्यक्तीने नैतिक जबाबदारी म्हणून स्वतः राजीनामा द्यायला हवा. असे होत नसेल तर इतर जबाबदार नागरिकांनी / सदस्यांनी त्या व्यक्तीचा पायउतार करायला हवा. पण असे होताना सध्या दिसत नाही. जबाबदार पदावर असलेले लोकं बेताल वक्तव्य, बलात्कार, छेडछाड, बलात्कारी व्यक्तीला वाचवत / समर्थन करत, हिंसा करत राहतात.  आणि हितसंबंध असलेलं लोक अश्या लोकांची वकिली करत राहतात त्यामुळेच त्यांना मोकळं रान मिळतं. (कदाचित वकिली करणारे देखील अश्याच कोणत्या तरी घटनेत सामील असतात आणि ती घटना बाहेर येऊ नये आणि...