Posts

Showing posts from December, 2018

नात्यातील प्रेम आणि काळजी समजून न घेता नात्याचा होणारा खून

अस्वस्थ        अस लहानपणापासून ऐकल होत की आई-वडील मुलांच्या चांगल्यासाठीच धड़पडत असतात, आपल्या मुलांसाठीच जगत असतात. पण आज दोन घटनांनी अस्वस्थ केल आहे. तेलंगानामधील ऑनर किलिंगची घटना ज्यात स्वतःच्या मुलाच आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर येत आहे. आज मुलीच्या सुखापेक्षा जातीधर्माचा अविर्भाव महत्वाचा वाटतो आहे. दूसरी घटना स्वतःच्या 9 वर्षाच्या मूलीवर एक बापच बलात्कार करतो. ही तर बाप नावाच्या पवित्र नात्याला काळींबा फासनारी गोष्ट आहे. कोणत्या नात्यावर विश्वास ठेवावा. एकीकडे आपल्या मुलीने आपल्याला न सांगता तीच्या आयुष्यातील निर्णय घेतला म्हणून ऑनर किलिंगचे प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या लैंगिक इच्छेसाठी स्वतःच्या चिमुरड़या मुलीवरच अत्याचार. ज्या मुलीला प्रेम, लैंगिकक्रीड़ा, आकर्षण यातल काहीही समजत नसतं. तरी देखील त्या इवल्याश्या चिमुरडीला या सगळ्याला समोरे जाव लागल. आज स्री स्वतःच्या कुटुंबातच सुरक्षित नाही.😔😔..         अस सांगितल जात पालकांच मुलांवर प्रेम असतं, म्हणून ते मुलांच्या भल्यासाठीच काही गोष्टीच्या काळजीपोटी त...

पितृसत्तेला सुरुंग देणारा निर्णय :- कलम ४९८ थोडक्यात आढावा

          कलम 497 या कायद्यानुसार एखाद्या पुरुषाची बायको त्याच्या सामंतीशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तर हा गुन्हा समजला जायचा, यात तो पती स्वतःच्या पत...

खेळ दृश्य-अदृश्य नात्याचा

Image
                    तुषारच शहरात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाण्याचं स्वप्न होतं. पदवीत्तर शिक्षण पूर्ण करून तुषार शहराकडे आला. तुषार हा परिस्थितींवर मात करुन अनेक संकटांना तोंड देत आजवर त्याच्या जीवनाचा प्रवास करत आला. त्यामुळे त्याला लहानपणापासूनचं परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची सवय  होती. दररोज घडणाऱ्या आजूबाजूच्या घटना - प्रसंगांकडे उघड्या डोळ्यांनी बघत तो त्याच्या जीवनाचा प्रवास करत होता. मानसशास्त्र त्याच्या अभ्यासक्रमाचा विषय नव्हता पण त्याला या विषयाची खूप आवड होती. या विषयाची तो जगण्याशी संबंध जोडून रोज नवनवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो जास्त बोलका नव्हता...समोरच्याला ऐकून घ्यायचा...खूप साऱ्या विचारधारा ऐकल्यानंतर त्यावर विचार करत असत. त्या विचारधारा आणि रोजचं जगण याचा संबंध जोडून पाहायचा. वाद-प्रतिवादांमध्ये तो फारसा पडत नसे. त्यातून दोन माणसं एकमेकांपासून दूर जातील असा वाद-प्रतिवाद किंवा संवाद टाळत असे. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याच्या अवतीभवती असणाऱ्या माणसांची त्याच्याबद्दलची मते ही बहुदा वरवरची...

#प्रतिक्रिया

           कधी कधी अती घाई करून चुकीचा समज करून जेव्हा व्यक्त होतो तेव्हा ती केवळ प्रतिक्रिया ठरते, केवळ काहीतरी गृहीत धरून प्रतिक्रिया केलेली असते ती फारशी विचारपूर्वक केलेली नसते त्यामुळे कधी कधी त्यातून आपल्याबद्दल समोरचा त्या प्रतिक्रियेवरून येणाऱ्या काळात धड़ा घेऊन एखाद्या मुद्द्यावर या माणसासोबत बोलयच की नाही याचा शंभरदा विचार करतो. त्यामुळे केवळ प्रतिक्रिया देऊन मोकळे होने म्हणजे आपल व्यक्तिमत्वावर मर्यादा घालण्यासारखच आहे. त्यामुळे घाई ही संवादातील अडथळा निर्माण होते. संवादासाठी पूरक वातावरण, वेळ, किंवा अन्य काही घटक नसतील तर अश्या वेळी मत बनवीने चुकीचे ठरते. त्यामुळे प्रतिक्रिया देताना घाई न करता, समजून उमजून जर व्यक्त झाल तर ती प्रतिक्रिया समोरच्याला विचार करायला भागही पाडु शकते व त्यातून काही चूकत असेल तर दोन्ही संवादकर्त्यांना त्यातून नवीन शिकायला भेटते. ----- ©स्वप्निल मानव

कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना

            कामाच्या ठिकाणी कामासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी छोट्या गोष्टी की ज्याकडून बहुदा दुर्लक्ष होत. कर्मचाऱ्याला कामाची जितकी गरज असते तितकीच गरज कंपनीला ही असणं गरजेचं आहे. इथे श्रमविभागणी तत्वाचा वापर कंपनीने केला तर बहुतेक प्रश्न आपोआप सुटतात. पण बऱ्याच वेळा अस होत की उच्च व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीवर विचार करत असत, परंतु मध्यम स्थरावरील कर्मचारी की ज्यांची खुप महत्वाची भूमिका असते, उच्च व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधील. इथेच मध्यम स्थरावरील व्यवस्थापन आपल्या सोयीने रिपोर्टिंग करतात. त्यामुळे उच्च व्यवस्थापनाच्या कामाच्या ठिकाणी नेमकं काय घडत हे लक्षात येत नाही.ते या मधल्या दुवाव्यावरच विश्वास ठेवतात. आणि मग सोयीने वागणाऱ्यांचं फावत. आणि मग त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम कामावर होतो. व्यवस्थापनाने विचार करून कंपनीच्या कामात व कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करणे गरजेचा आहे. १. नोकरीच्या ठिकाणी जर ठरलेल्या वेळेच्या नंतर जर एम्प्लॉयीने अधिक काम करावं असं वाटत असेल तर ते करून घेताना नम्रपणे करून घ्य...

प्रवास खाजगी कंपनीतील कामाचा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=966434200223116&id=100005696348947               अनेक दिवसांपासून या विषयावर मत मांडायचे होते.मी आज व्यक्त होतोय. सध्या सरकारी नोकऱ्यांची उपलब्धता लक्षात घेता तुलनेत दरवर्षी पदवीधर होऊन पास होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि स्पर्धेमुळे खूप तरुणांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्यांन पर्यंत उरतो किंबहुना ती खाजगी नोकरी करणं भाग पडतं. या परिस्थितीला मीही बळी ठरलो असं म्हणण्याला हरकत नाही. अगदी निवड प्रक्रियेपासून तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारची हैरारकी किंवा एक विशिष्ट गट आपले अस्तित्व घट्ट करण्याचा प्रयत्न करताना जाणवलं. सत्तेचं केंद्रीकरण आणि अधिकारांचा सोयीनुसार आणि मूडनुसार वापर होताना दिसला. खरंतर ज्या त्या विभागानुसार पदवीधर झालेला कोणताही विद्यार्थी प्रशिक्षण दिल्यानंतर प्रक्रिया समजून घेऊन काम करू शकतो फारसं अवघड काही नसतं. पण सुरुवातीला आपण नवीन असल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून दडपण निर्माण करून ही ...