Posts

Showing posts from October, 2019

ऑनलाइन बोलताय जरा जपून...

Image
कोणतेही नातं निभावत असताना जर त्या नात्यांमधील पात्र वेगवेगळ्या प्रांतातील असतील तर संवाद साधत असताना भाषेची अडचण येऊ शकते, कारण मराठी भाषा ही काही अंतरानंतर तीच वळण, उच्चर, टोनिंग, शब्दरचना बदलते  व त्यामुळे एका प्रांतात बोललेलं एखादं वाक्य दुसऱ्या प्रांतात वेगळा अर्थ निघू शकतो. त्यामुळे कोणताही संवाद साधत असताना भाषेची माहिती घ्यावी. मैत्रीत गैरसमज होऊ नये यासाठी ही काळजी घ्यावीच. हे झालं प्रत्यक्ष बोलताना, पण जर ऑनलाइन बोलत असाल तर मात्र अजून जास्त काळजीपूर्वक बोलणं गरजेचं असतं, कारण इथे बोललेलं वाक्य ऐकू येत नाही त्यामुळे त्यातील टोनिंग समजत नाही, आवाजातील चढउतार समजत नाही, चेहऱ्यावरील हावभाव समजत नाही त्यामुळे ते टाईप केलेलं वाक्य वाचणार ज्या मुड मध्ये असेल तसा घेतो. त्यामुळे ऑनलाइन बोलताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच मोबाईल नावाच्या एडियट बॉक्सवर बोलावं, नाहीतर अवघड. संवादातील हा एक मोठा अडथळा ठरू शकतो त्यामुळे जपून... (स्वानुभव) © स्वप्निल मानव

लिंगभाव: नैसर्गिक की सामाजिक?...

लिंगभाव म्हणजे काय याची स्पष्टता यायची असेल तर महत्त्वाचा प्रश्न असेल, ‘नैसर्गिक की सामाजिक?’ पुरुष सर्वाधिक हिंसा करतात, हे खरेच. पण तो निसर्गत:/जन्मत: हिंसक असतो की त्या...