Posts

Showing posts from September, 2024

जबाबदार नागरिकांचे कर्तव्य

Image
जबाबदार नागरिकांचे कर्तव्य- लैगिंक शोषणात प्रत्येक आरोपीला कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आरोपीला पाठीशी घलनाऱ्यांना देखील तितकीच कडक कायद्याने शिक्षा दाखल झाली पाहिजे. कोणतीही शिक्षा देण्याची एक प्रतिक्रिया असते ते पूर्ण करूनच शिक्षा व्हायला पाहिजे. जर ती प्रक्रिया न पूर्ण होत मारलं जात असेल तर तिथे कायद्या व सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते.  न्यायालयीन प्रक्रियेला महत्व दिले पाहिजे. आरोपी कोणताही असो त्याला गंभीर शिक्षा झाली पाहिजे, पण ती शिक्षा संविधानातील तरतुदीनुसार झाली पाहिजे. आपल्या भारतीय संविधानात सर्व चुकीच्या कृत्यांना शिक्षा आहेत. त्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, अगदी फाशीची शिक्षेची तरतूद देखील आहे. त्याची एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करून ती शिक्षा संबंधित गुन्हेगाराला दिली पाहिजे.  जे लोक कायदा व सुव्यवस्थेला नाव ठेवतात त्यांनी स्वतःला विचारावं की आपण कायदा व सुव्यवस्था काटेकोर होण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा काय योगदान आहे? एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर व सामूहिक पातळीवर काय प्...