Posts

Showing posts from 2022

Mentalhealth and relationship

Image
#mentalhealth #relationship #friendship #love ब्रेकप आणि त्यातून येणारे नैराश्य याबाबतच्या घटना आपण आजकाल सर्रास टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहतो, ऐकतो. अनेक जणांच्या बाबतीत ही एक सामान्य घटना असू शकते, काहींना दरवेळी ठराविक काळानंतर नवीन नात्यात गुंतण्याची सवय असू शकते. तर काहींच्या बाबतीत आयुष्य बदलून टाकणारा हा प्रसंग असतो. बऱ्याच जणांना प्रेम, मैत्री, रिलेशनशिप यातले नेमके काय हवे आहे हे माहीत नसते. काहीजणांना माहीत असते तर काहींना माहित असून देखील ते लोक त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे या भावनांचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात, किंवा कुणी नवीन व्यक्ती आवडू लागते पण स्पष्ट बोलता येत नाही, किंवा तात्पुरते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला भ्रमात ठेवले जाऊ शकते, पण जबाबदारी घेण्याची तयारी नसल्यामुळे गोष्टी अंगावर आल्या की झटकल्या जाऊ शकतात. काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्ती आवडू लागतात. रिलेशनशिपमध्ये ओपन रिलेशनशिप सारखे देखील प्रकार असतात. अशा अनेक गोष्टींची अस्पष्टता तयार झाल्यामुळे कधीतरी आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती, आपले चांगले मित्र-मैत्रिणी दुखावले ज...

निःस्वार्थ मदतीची भावना

Image
       प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही चढउतार सुरूच असतात. या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करत असतो.  मदत बऱ्यादा आपल्याला जाणवते की, समोरच्याला मदतीची गरज आहे किंवा समोरच्या स्वतःहा आपल्याकडे मदत मागतो आशा वेळी केली जाते. कोणत्याही परिस्थितीत ही मदत करत असताना समोरच्याला ओझे वाटेल किंवा उपकाराची भावना येईल अशी मदत कधीच करू नये. मदत का करतो? तर कुणाला तरी कठीण काळात गरज असते म्हणून आपण मदत करतो आणि आपल्याला ती मदत करणे शक्य असते म्हणून ती मदत करू शकतो. आपण ती मदत केली नाही तर दुसरं कुणीतरी त्या व्यक्तीला ती मदत करणारच असतं किंवा समोरचा व्यक्ती त्यातून काहीतरी मार्ग काढणारच असतो. त्यामुळे आपल्याच मदतीमुळे समोरचा व्यक्ती आता सुखावला आहे असा भाव मनात येऊ नये, आणि जर तो येत असेल तर आपण समोरच्याला मदत नाही तर व्यवहार केला आहे असा अर्थ होतो. मग हा व्यवहार असेल तर त्याची कल्पना दोन्ही व्यक्तींना सारखीच असायला हवी.               आपण मदत करतो म्हणजे काही ना काही अपेक्षा असतातच असं म्हटलं जातं, हो त्यातू...