जरा विचार तर करू...
आजही देशात अनेक समस्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची मानसिकता हलकी होत चालली आहे. म्हणून समाजात मानसिकता बदलण्यासाठी काम करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही प्रश्न असो त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येईल की, वाईट मानसिकतेतूनच हे सर्व प्रकार घडत आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर हिंसेचे प्रमाण वाढत चालले आहे. ही हिंसा थांबविण्यासाठी अनेक अंगाने मानसिकता बदलासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनेक पैलू समजून घेऊन समाजात चर्चा आणि संवाद व्हायला हवा. गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार, छेडछाड हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे इतक्यावरच थांबत नाही तर बलात्कारानंतर अगदी क्रूर पध्दतीने खून देखील होत आहेत. हे चित्र फार त्रासदायक आहे. असे अमानुष प्रकार कोणताही हंगाम पाहून होत नाही तर कोणत्याही काळात हे प्रकार घडू शकतात. लॉकडाऊनच्या काळात देखील असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी आजपर्यंत काय झाले? कँडल मार्च, आंदोलन, मोर्चे, निवेदन... पण पुढे काय? या सगळ्यात पिडीत व्यक्तीला खरंच न्याय भेटला का? हे प्रश्न अ...