सेवा दल बढाना है, परिवर्तन लाना है!
सेवा दल ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक विचारधारा आहे- समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर उभी असलेली एक चळवळ. या चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर समानपणे आहे. त्यामुळे *“आपण कोणत्या गटात आहोत?” यापेक्षा “आपण सेवा दलासाठी काय करतो आहोत?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.* आज देशात जे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वातावरण निर्माण झाले आहे, ते पाहता सेवा दलासारख्या संघटनांची भूमिका अधिक निर्णायक ठरते. अशा वेळी आपण अंतर्गत मतभेद, वैयक्तिक अहंकार, जुने वाद किंवा व्यक्तीगत भावना यामध्ये अडकून राहिलो, तर आपण आपल्या मूलभूत ध्येयापासून दूर जाऊ. त्यामुळे ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आणि एकत्र येण्याची. संघटनेत मतभेद असणे हे नैसर्गिक आहे, कारण विचार करणाऱ्या लोकांमध्ये विविधता असतेच. पण हे मतभेद जर संवादाने, आदराने आणि सामोपचाराने सोडवले, तर ते संघटनेला अधिक सक्षम बनवतात. उलट, जर तेच मतभेद वादात, गटबाजीमध्ये किंवा वैयक्तिक संघर्षात रूपांतरित झाले, तर ते संघटनेला कमकुवत करतात. त्यामुळे “मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत” ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. चुका होणे ह...