Posts

Showing posts from 2020

आत्महत्या (Suicide)...

Image
आत्महत्या असो की इतर कुठली घटना, लगेचच उलटसुलट चर्चा सुरू होते. प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. मला वाटतं, प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षा आपल्याला प्रश्न पडायला हवे. मुळात अशी घटना का, कुठे, कशामुळे, घडली? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत प्रतिक्रिया टाळायला हवी. आपल्यापर्यंत जी माहिती पोचली ती खरी आहे का? त्या माहितीचा स्रोत काय? माहिती पोचवण्याऱ्या व्यक्तीने जबाबदारीने, संवेदनशीलतेने ती माहिती पोचवली आहे का? असे मूलभूत प्रश्न महत्वाचे आहेत.  गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटना आपण बघत आहोत, याआधीही बघितल्या आहेत. आत्महत्या कुणाची का असेना, शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, सासरच्या त्रासाने त्रस्त सुनेची, इत्यादी. कुठल्याही कारणासाठी का असेना, त्यात एक कॉमन गोष्ट असते. अतीव दुःख, निराशा, संपल्याची भावना, हताश, असहायता, काहीच मार्ग न दिसणं, आहे ही परिस्थिती कधीच बदलणार नाही असा ठाम विश्वास, त्रागा, क्रोध, राग, अस्वस्थता, कुचकामीपणा इत्यादी आणि हे सगळं तीव्र स्वरूपाचं..... खूप त्रास व यातना असतात... आत्महत्या suicide अचानक एका दिवसात instantly घडत नाही दीर्घकालीन त...

बाकी विराज जगतापच्या न्यायासाठी कटिबद्ध राहुयात...

Image
गेल्या काही दिवस सोशल मीडियावर खास करून टिकटॉकसारख्या भिकार माध्यमावर जो काही निचपणा चालला आहे तो थांबला पाहिजे.. कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विभूती लाभलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार घडण अतिशय लज्जास्पद आहे.. प्रबोधनाचा एक मोठा टप्पा अजूनही आपल्याला गाठायचा बाकी आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.. ह्या दोनही महापुरुषांनी स्त्रियांचा सन्मान राखला आहे..मग ती स्त्री कुठल्याही समाजाची असो..एक नवा आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवला असतानाही त्यांच्या मूळ शिकवणीला बाजूला ठेवून काही समाजकंटक #मराठा-बौद्ध असा वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे..ह्या षडयंत्राची कल्पना फार लवकर आम्हाला झाली होती..म्हणूनच सुरवातीला एक पोस्ट आम्ही टाकली होती..जी आज खरी होताना दिसत आहे.   असे प्रयत्न जे कोणी करत असेल त्या (दोन्ही बाजूच्या) नीच प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत... पुन्हा एकदा सजगपणे काम करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांना आवाहन आहे त्यांनी पुढे याव.. आग लावणाऱ्या लोकांपासून समाजाला वाचवाव.. अन्यथा हा...

मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी

सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकतं रायन पिंटो सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे.  १. अबोला- तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे असाल, तर घरी राहणाऱ्या मुलांशी व्हिडीओ कॉल किंवा ...

मुलांमधील गुण

मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही. काटकसरी वस्तू वापरण्याची सवय असली की मन हे शोधत राहतं, आपण उधळपट्टी तर करत नाही ना? स्वत:ला अनेक दिवस हे शिकवावं लागतं. ते अचानक होत नाही.  - तू मला आवडतेस. - माझा तुझ्यावरच विश्वास आहे. - हे तू छान केलंस हं! - तुझं मत मला सांग. - माझं चुकलं बरं का!  वरील पाच वाक्यं मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. आपण आपल्या आई-वडिलांना आवडतो ही भावना छान असते. आपण थोडेच आपल्या मुलांना 'आय लव यू, आय लव यू' असं म्हणणार आहोत? आपलं प्रेम त्यांना आपल्या वागण्यातूनच कळायला हवं. डोळे, भुवया, कपाळ हा भाग मुलांकडे पाहताना जाणीवपूर्वक प्रसन्न ठेवावा. नाही तर कपाळाला आठय़ा घालून, भुवयांचा संकोच करून, डोळे वटारूनच मुलांकडे पाहिलं जातं. असं होऊ नये. पाठीवरून प्रेमानं हात फिरवला की मुलांपर्यंत आपली माया पोचते. मुलाचा चेहरा उतरलेला दिसला की काय झालं बाबा? असं काळजीनं विचारलं की त्याची अर्धी चिंता दूर होते. 'मुलं ऐकतील असं बोलावं कसं आणि मुलं बोलतील असं ऐकावं कसं?' ऌ६ ३ ळं'' र ङ्र२ि ह्...

ओळख

Image
आज अश्या एका मुद्द्यावर बोलण्याची गरज निर्माण झाली, की जो मुद्दा नेहमी दुर्लक्षित केला जातो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन एकत्र / संपर्कात राहतात. उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप ग्रुप इ ... माध्यमातून लोक संपर्कात राहतात. आज व्हाट्सअँप ग्रुपचा वापर जास्त केला जातो. मग हे ग्रुप एकत्र शिकत असतात म्हणून बनवले जातात, कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा असतो, सामाजिक क्षेत्रात काम करत असतो म्हणून त्या त्या चळवळीचा ग्रुप असतो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांची एकमेकांशी वेगवेगळ्या माध्यमातून ओळख होते, ती कधी एकत्र काम करताना तर कधी काही कार्यक्रमात ओळख होते तर कधी कॉमन मित्राकडून ओळख होत असते. अश्याच ओळखीतून खूप वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि ओळखी वाढतात. काहींसोबत ही ओळख फक्त चेहऱ्याने होते, तर काहींसोबत नावाने होते, तर कधी ही ओळख अगदी मैत्रीच्या पातळीवर होते. ही ओळख अश्या वेगवेगळ्या प्रकारची असते. अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आपले मित्र किंवा सामाजिक कार्यकर्ते एकमेकांना ऍड करतात. हे ग्रुप कामाच्या नियोजनासाठी असता...

येत्या काळात व्यवसायिक सामाजिक कार्यकर्त्या समोरील आव्हाने!!!

- covid-19 या महामारीचा अनुभव आपल्या सगळ्यांचा पहिलाच आहे, या लॉक डाउन चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, या परिस्थिती मध्ये आपण जिथे आहोत तिथे आपण प्रयत्नशील आहोत, झुंजतोय,  हातावरच पोट असलेल्या कुटुंबांना अन्न पुरवणं, वेश्या व्यवसायातील महिलांना मदत करणं, अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबांना आधार देतोय, आरोग्य क्षेत्रात देखील जमेल ती जबाबदारी उचलत आहोत, या परिस्थितीत खचलेल्या सर्व सामन्यासाठी समुपदेशन आपण करतोय, विविध ऑनलाइन चर्चा सत्र, वेबिनार आपण घेत आहोत.   अश्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या या इच्छाशक्तीला व जिद्दीला सलाम.  - खर पाहिलं तर ही झुंज आत्ता सुरू झालीय, कारण लॉक down नंतर मोठी आव्हान आपल्याला पेलवायची आहेत, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे, त्याची तयारी आत्तापासून करायला हवी आहे. कुठल्या आव्हानांची शक्यता वाटते आहे - आर्थिक संकट!! सर्वच वर्गातील माणसां समोर हे संकट उभं राहिल, एखादा वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी धरपडेल तर एखादा वर्ग भांडवली व्यवस्थेत टिकण्यासाठी प्रयत्न करेन.  दारिद्र्याचे दुष्ट चक्र व त्या पाठोपाठ येणारे प्रश्न. बेरोजगारी, नैराश्...

मुलं तणावात आहे कसं ओळखाल?

मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकतं रायन पिंटो सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे. १. अबोला- तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-...

आपण मुलांशी बोलायला शिकू या !

मुलं २-३ वर्षांची होती तेव्हाचं आठवतं. दोघं आपापसात भांडणं करून तक्रारी करायला आली की मी म्हणायची, बघू बरं, माझ्याकडे बघा दोघांनी. कोण खोटं बोलतंय मला डोळ्यात बरोबर दिसतं आणि खरं बोलणारं मूल डोळ्याला डोळा भिडवून पाहू शकायचं. खोटं बोलणारं हसू लागायचं, नाही तर गोरंमोरं व्हायचं. तो झगडा तिथेच मिटायचा. पुढे-पुढे तर आपली बाजूच खरी आहे, हे पटवण्याची घाई असलेलं मूल आपली चिमुकली अंगठ्याजवळची बोटं दोन्ही डोळ्यांच्या खाली ठेऊन, डोळे ताणून मोठे करून म्हणायचं- ‘बघ माझ्या डोळ्यांत. मी खरं बोलतोय.’ हा निरागपणा नंतर मात्र राहत नाही. तो वेगवेगळी रूपं घेत जातो. आता ७-८ वर्षांची मुलं आपली बाजू हिरीरीनं मांडतात. चुकून समजण्यात चूक झाली, त्यांच्यावर आरोप केले तर दुखावतात. कधी कोण खरं कोण खोटं सांगतो आहे, कळेनासं होतं. रुसवे-फुगवे होतात आणि मग मलाच म्हणावंसं वाटतं, खरं-खोटं मला ठरवता येत नाहीय; पण माझ्या डोळ्यांत तुम्हा दोघांविषयी सारखंच प्रेम तरी दिसतंय ना तुम्हाला? रागावू नका बाबांनो ! ही आपलीच मुलं आपल्याला किती गोंधळून टाकतात! लहानपणी वाटतं ही मोठेपणी कशी होणार आहेत, कोडंच पडतं. मोठी झाल्यावर कोडं पडतं...

#माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो

आमचा युवा सहकारी रशिद लिहीतोय! #माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो मी रशिद मणियार...धर्माने मुसलमान. (नाईलाजास्तव धर्म सांगावा लागतोय) माझी सगळी जडणघडण समाजवादी, पुरोगामी चळवळीत झाली. हा वारसा मला माझ्या आजोबांकडून मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी आणि सुफी पंथाच्या शिकवणीचा मी फॉलोवर आहे. त्यामुळे मुल्ला/मौलवींची जहागिरदारी असलेला इस्लाम मला मान्य नाही. मात्र प्रेषित महंमद पैगंबरानी सांगितलेला शांती आणि समतेच्या इस्लामला मी मानतो.. हे सगळं सांगण्याच कारण अस की आज सगळा देश लॉकडाऊन असताना देखील ज्या पद्धतीच्या डिबेट्स देशभर चालताहेत त्या बघून एक सच्चा मुसलमान म्हणून मी व्यथित होतो.. सर्वप्रथम तब्लिगी प्रकरणावर माझी भूमिका मांडावीशी वाटते.. मुळात कोरोनाच इतकं संकट जगभर आणि भारतभर पसरत असताना हा धर्ममेळा आयोजित करण्याची खरच काही गरज होती का?? देशविदेशातील लोकांना आमंत्रण देऊन बोलवायची काही गरज होती का? तर नक्कीच नाही. अस पण सर्वात लाजिरवाणी गोष्ट झाली ती म्हणजे डॉक्टर/पोलीस यांच्यावर थुंकण्याचा घाणेरडा प्रकार काही तब्लिगीनी केला..तो अमानवी आहे..घृणास्पद आहे..जेव्हा मानवतेवरील संकट दूर करण्यासा...

स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद...

पुरुष उत्तेजित झाला आहे हे त्याच्या ताठरलेल्या लिंगावरून सिध्द होते. पण स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे बहुतेक पुरुषांना न समजल्यामुळे संभोग कष्टप्रद होत असतो. म्हणजे स्त्री उत्तेजित झालेली नसतांना लिंग योनीमार्गात सुखदायकरित्या शिरू शकत नाही. योनीमार्ग कोरडाच राहिल्याने त्यात शिस्नाचा प्रवेश सहजगत्या होण्याऐवजी वेदनादायी होतो. पुरुषाला लिंग आत घुसडण्याची कमालीची घाई झालेली असते कारण पुरुषाच्यामते संभोग म्हणजेच मैथून असते. परंतु स्त्रीच्या मते प्रणय हेच मैथून असते. संभोग तिला खूप शेवटी हवा असतो. पुरुष आधी संभोग करू पाहतो आणि स्त्रीला ते कष्टदायक वाटते व ती असा घाईघाईचा संभोग टाळू पाहते. म्हणून स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे पुरुषाने कसे ओळखावे त्याच्या काही टीप्स यशस्वी संभोगासाठी पुरुषाला जाणून घ्यायलाच हव्यात...  १)-- पुरेपूर प्रणय आमलांत आणल्यानंतर स्त्री डोळे मिटून घेते. तिचे ओठ थरथरू लागतात. पापण्या शहारतात. अंगांग रोमांचित होत जाते. योग्य प्रणयक्रीडेने ती अधिक उत्तेजित होत जाते. चेहऱ्यावर आसुसलेपणाची भावना प्रकट होऊ लागते. ती पुरुषाला अधिक घट्ट बिलगून जाते....

विज्ञान म्हणजे काय?

विज्ञान म्हणजे काय? निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत! विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं प...

सामाजिक संस्थांच कंपनीकरण

             हल्ली सामाजिक संस्थांचा (NGO) बहुतांश किंबहुना सर्वच काम हे निधी पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सांगण्यावरून ठरताना दिसत आहे.  “सामाजिक काम देखील आता प्रोफेशनल होणार”, CSR हा शब्द ऐकला की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जनांत अशा प्रतिक्रिया चटकन उमटतात. सामाजिक संस्थांना निधी पुरविणारे सांगतील त्या विषयावर काम करावं लागतं आहे. संस्था स्थापन करताना ठरविलेला उद्देश काही वेळा दुरक्षित होतो हे लक्षातही येत नाही. कोणतीही सामाजिक संस्था सुरळीत काम करत आहे हे ते करत असलेले काम लाभार्थ्यांना किती प्रमाणात किंवा किती गुणवत्तापूर्ण भेटत, संस्था करत असलेल्या कामाचा लाभार्थीला किती फायदा झाला, त्यांच्या आयुष्यात किती चांगले बदल झाले, जीवनमानात किती सकारात्मक बदल झाला यावरून संस्थेची सफलता ठरत असते. संस्थांना आर्थिक मिळकत ही कंपन्यांच्या CSR मधून होतो. मग हा फंड / निधी कंपनी सामाजिक संस्थेला देऊन त्यांच्या उत्पन्नातील कमी भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करते.                सामाजिक कामांसाठी खर्च म्हणजे नक्की कोणत्या ...