Posts

Showing posts from May, 2026

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

Image
राजूर येथे ५५ अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. मात्र, माध्यमांमध्ये झळकलेल्या घटनाच आपल्याला दिसतात; ज्या घटना समोर येत नाहीत, ज्या बालिका भीतीपोटी किंवा सामाजिक दबावामुळे बोलू शकत नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा आहे. बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, अल्पवयीन गर्भधारणा आणि बालकांवरील हिंसा या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या समाज, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामूहिक अपयशाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत प्रतिबंधात्मक (Prevention-Based) पातळीवर सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक काम होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. केवळ एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे किंवा आरोपींना अटक करणे पुरेसे नाही. बाल संरक्षण ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून, ती संपूर्ण सामाजिक आणि प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त जबाबदारी आहे. बालकांसोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची  पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती, गाव बाल संरक्षण समिती, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रण...

संविधानिक भूमिका घेताना...

Image
संविधानाबद्दल बोलताना आणि वागताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. मात्र संविधानिक भूमिका म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही विषयावर प्रभावीपणे काम करायचे असेल तर त्या विषयाची स्पष्टता असणे गरजेचे असते. त्यामुळे संविधानिक भूमिका घेताना आपण कोणत्या स्तरावर, कोणत्या भूमिकेतून आणि कोणत्या व्यवस्थेसंदर्भात विचार करत आहोत, याचा बारकाईने विचार होणे आवश्यक आहे. भारतामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक व्यवस्था अस्तित्वात आहेत. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थांना भारतीय संविधानाचा आधार मिळाला. संविधानात बदल करतानाही त्याच्या मूलभूत मूल्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवस्थेची नियमावली स्वतंत्र असली तरी तिचा आधार संविधानिक मूल्यांवरच असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक अशा तीन स्तरांवर जीवन जगत असते. या तिन्ही स्तरांवर निर्णय घेताना संविधानिक मूल्यांचा संदर्भ वेगळा असतो. अनेकदा व्यक्तिगत किंवा कौटुंबिक निर्णय घेताना सामाजिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांची गल्लत होते आण...

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...

Image
सरकारी शाळा बंद होऊ नयेत ही भूमिका समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि आवश्यक आहे. मात्र ही भूमिका केवळ भावनेवर आधारित न राहता, ती पूर्णपणे बालकेंद्री, वास्तवाधारित आणि जबाबदार विचारांवर उभी राहिली पाहिजे. सरकार शाळा बंद किंवा विलीन करण्यामागे कमी पटसंख्या, संसाधनांचा वापर, स्थलांतर इत्यादी कारणे देत असते. पण या पार्श्वभूमीवर आपण एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे,  शाळा सुरू ठेवणे म्हणजे त्या मुलाला खरोखरच गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध शिक्षण मिळत आहे का? विशेषतः ज्या शाळेत एकच विद्यार्थी आहे, अशा ठिकाणी त्या मुलाचा सर्वांगीण विकास होतो का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळा ही केवळ अभ्यास शिकवण्याची जागा नसून ती मुलाच्या सामाजिक, भावनिक आणि वैचारिक विकासाची जागा असते. मित्रांसोबत संवाद, गटात काम, स्पर्धा, सहकार्य, खेळ या सगळ्या गोष्टी मुलाच्या व्यक्तिमत्त्व घडवतात. एकट्या विद्यार्थ्याच्या शाळेत हे अनुभव जवळजवळ नसतात, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि शिकण्याची प्रेरणा कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच, शाळा अस्तित्वात असली तरी शिक्षणाचा आत्मा कमी पडतो....