#माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो
आमचा युवा सहकारी रशिद लिहीतोय!
#माझ्या_भारतीय_बंधु_भगिनींनो
मी रशिद मणियार...धर्माने मुसलमान. (नाईलाजास्तव धर्म सांगावा लागतोय) माझी सगळी जडणघडण समाजवादी, पुरोगामी चळवळीत झाली. हा वारसा मला माझ्या आजोबांकडून मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी आणि सुफी पंथाच्या शिकवणीचा मी फॉलोवर आहे. त्यामुळे मुल्ला/मौलवींची जहागिरदारी असलेला इस्लाम मला मान्य नाही. मात्र प्रेषित महंमद पैगंबरानी सांगितलेला शांती आणि समतेच्या इस्लामला मी मानतो..
हे सगळं सांगण्याच कारण अस की आज सगळा देश लॉकडाऊन असताना देखील ज्या पद्धतीच्या डिबेट्स देशभर चालताहेत त्या बघून एक सच्चा मुसलमान म्हणून मी व्यथित होतो..
सर्वप्रथम तब्लिगी प्रकरणावर माझी भूमिका मांडावीशी वाटते..
मुळात कोरोनाच इतकं संकट जगभर आणि भारतभर पसरत असताना हा धर्ममेळा आयोजित करण्याची खरच काही गरज होती का?? देशविदेशातील लोकांना आमंत्रण देऊन बोलवायची काही गरज होती का? तर नक्कीच नाही. अस पण सर्वात लाजिरवाणी गोष्ट झाली ती म्हणजे डॉक्टर/पोलीस यांच्यावर थुंकण्याचा घाणेरडा प्रकार काही तब्लिगीनी केला..तो अमानवी आहे..घृणास्पद आहे..जेव्हा मानवतेवरील संकट दूर करण्यासाठी डॉक्टर/पोलीस अहोरात्र झटत आहे...तेव्हा त्यांना सलाम करण्याची खरी गरज आहे.तेच खऱ्या अर्थाने आज आपले देवदूत/प्रेषित आहेत..तब्लिगीच्या चुकांची किंमत सामान्य मुस्लिम म्हणून आपल्याला सहन करावी लागतेय..मीडियाला जे न्यारेटिव्ह आपल्या समूहाबद्दल तयार करायच आहे ते करण्यात ते यशस्वी होताहेत..बातम्यांच्या हेडलाईनवरून कळतच असेल..चक्क "कोरोना जिहाद" म्हंटल जातंय..पण त्या सगळ्या मीडियावाल्याना माझं इतकंच सांगणं आहे मुसलमानांशिवाय इतर समाजानेही निर्बंध तोडले आहेत. इतर समाजातील मान्यवरांनी पण निर्बंध तोडले आहेत पण तिथे तुम्ही व्यक्तींना दोषी मानता संपुर्ण समाजाला लक्ष्य करत नाही. मग मुस्लीमांच्या बाबतीत मात्र संपुर्ण समाजाला लक्ष्य करण्याचा तुमचा हेतू प्रामाणिक वाटत नाही हे ही माध्यमातल्या आमच्या मित्रांना याप्रसंगी आवर्जुन सांगावस वाटत. तब्लिगीच्या चुकांची शिक्षा आम्हा सामान्य गोरगरीब मुसलमानाना देऊ नका.. ही वेळ हिंदू-मुस्लिम करण्याची नाहीये.. तर एकजुटीने या संकटाशी मुकाबला करण्याची गरज आहे...
------///------///---///---//
मुस्लिम बांधवाना आवाहन-
------/----------/--------/-------/---
लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणाहून बातम्या येत होत्या की एकत्र येऊन नमाज पठण केली जातेय..मला वाटत देशात इतकी आपत्ती ओढवली आहे याच भान सगळ्यानी ठेवण्याची गरज आहे..माझं सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन आहे की काही दिवस कळ काढा..घराबाहेर पडू नका..एकत्र येऊ नका...घरातच नमाज पडा.आपण स्वतःला मानवतेचे पूजक समजत असू तर सगळ्या मानवांच्या कल्याणाची "दुवा" करा..त्यासाठी अल्लाहकडे "ईबादत" करा...
सरकार/पोलीस/डॉक्टर सगळ्यांना सहकार्य करा...
- © रशिद मणियार
Comments
Post a Comment