जबाबदार नागरिकांचे कर्तव्य
जबाबदार नागरिकांचे कर्तव्य-
लैगिंक शोषणात प्रत्येक आरोपीला कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आरोपीला पाठीशी घलनाऱ्यांना देखील तितकीच कडक कायद्याने शिक्षा दाखल झाली पाहिजे.
कोणतीही शिक्षा देण्याची एक प्रतिक्रिया असते ते पूर्ण करूनच शिक्षा व्हायला पाहिजे. जर ती प्रक्रिया न पूर्ण होत मारलं जात असेल तर तिथे कायद्या व सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते.
न्यायालयीन प्रक्रियेला महत्व दिले पाहिजे. आरोपी कोणताही असो त्याला गंभीर शिक्षा झाली पाहिजे, पण ती शिक्षा संविधानातील तरतुदीनुसार झाली पाहिजे. आपल्या भारतीय संविधानात सर्व चुकीच्या कृत्यांना शिक्षा आहेत. त्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, अगदी फाशीची शिक्षेची तरतूद देखील आहे. त्याची एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करून ती शिक्षा संबंधित गुन्हेगाराला दिली पाहिजे.
जे लोक कायदा व सुव्यवस्थेला नाव ठेवतात त्यांनी स्वतःला विचारावं की आपण कायदा व सुव्यवस्था काटेकोर होण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा काय योगदान आहे? एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर व सामूहिक पातळीवर काय प्रयत्न केले. आणि याच उत्तर तर काहीच प्रयत्न केले नाही असं येत असेल तर कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
भारतातील नागरिक कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करत नाही याचाच फायदा शोषण करणारे, त्यांना पाठीशी घालणारे किंवा वंचित व दुर्बल व्यक्तीला समोर करून स्वतः गुन्हा करणारे लोक घेतात, ही गोष्ट सर्व जबाबदार नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे.
बलात्कार हा खूप गंभीर गुन्हा आहे त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे, त्यासाठी देखील कडक शिक्षेची तरतूद आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर कशी होईल यासाठी नागरिकांनी आग्रही राहील पाहिजे. पिढीत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी देखील प्रयत्न करत राहिले पाहिजे. न्याय म्हणजे केवळ आरोपीला शिक्षा इतकं नव्हे. आरोपी शिक्षा झाली पाहिजे त्याचसोबत पिढीत बालकाच्या किंवा व्यक्तीच्या लेखी न्याय म्हणजे काय याचा विचार करणार आहोत की नाही. पिढीत व्यक्तीला चांगलं शिक्षण मिळावं, समाजाने त्या पिढीत व्यक्तीला सकारात्मक दृष्टीने बघून तिचा स्वीकारावं, त्या व्यक्तीला तिच्यासोबत अत्याचार झाला आहे म्हणून सतत वाईट असेल, गिल्ट वाटेल अशी वागणूक न देता तिला इतर नागरिकांनप्रमाणे तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हा त्या पिढीत व्यक्तीला खऱ्या अर्थाने न्याय असेल. पण आज समजत बलात्कार करणारा मोकाट फिरतो, मात्र पिढीत व्यक्तीलाच तोंड लपवत फिरावं लागत. ती व्यक्ती समोरून आल्यावर लगेच कुजबुज अरे ती बघा तिच्यावर अत्याचार झाला. यातून त्या व्यक्तीची जगण्याची आणि नवीन काही करण्याची हिम्मत कमी होते. यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहे.
एक जबाबदारी नागरिक म्हणून कायदा व सुव्यवस्था कशी बळकट होईल यासाठी वैयक्तिक व सामूहिक पाळातीवर सातत्याने प्रयत्न करत राहावे लागणार आहे. म्हणून कोणत्याही घटनेकडे बघताना भावनाविवश होऊन न बघता संविधानिक दृष्टीने बघून पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल व आरोपीला कायद्याने शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणे हेच एका जबाबदारी नागरिकांचे कर्तव्य आहे.
© स्वप्निल मानव,
(बाल हक्क कार्यकर्ता)
Comments
Post a Comment