जबाबदारी आणि नैतिकता
समाजात अशांतात पसरेल, समाजा-समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे असंविधानिक आहे. असंविधानिक वागणे किंवा बोलणे ज्यातून शोषण होत असेल, हिंसा होत असेल किंवा द्वेष निर्माण होत असेल तर अश्या व्यक्तीवर कारवाई व्हायलाच हवी. मग ही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो. आणि हे सर्व जर जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून कारवाई व्हायला हवी. मग ही व्यक्ती सरकारमध्ये असो, किंवा कोणत्याही राजकिय पक्षात असो किंवा कोणत्याही सामाजिक संघटनेत / संस्थेत असो किंवा यापैकी कोणत्याही जबाबदार पदावर असो त्या व्यक्तीने नैतिक जबाबदारी म्हणून स्वतः राजीनामा द्यायला हवा. असे होत नसेल तर इतर जबाबदार नागरिकांनी / सदस्यांनी त्या व्यक्तीचा पायउतार करायला हवा. पण असे होताना सध्या दिसत नाही. जबाबदार पदावर असलेले लोकं बेताल वक्तव्य, बलात्कार, छेडछाड, बलात्कारी व्यक्तीला वाचवत / समर्थन करत, हिंसा करत राहतात.
आणि हितसंबंध असलेलं लोक अश्या लोकांची वकिली करत राहतात त्यामुळेच त्यांना मोकळं रान मिळतं. (कदाचित वकिली करणारे देखील अश्याच कोणत्या तरी घटनेत सामील असतात आणि ती घटना बाहेर येऊ नये आणि त्यांच्या वृत्तीचे लोकं एकत्र राहून त्यांचे जे सुरू आहे ते तसेच सुरू रहायला हवे त्यामुळेच ते अश्या व्यक्तीची वकिली करतात आणि समर्थही करतात हे निरीक्षण आहे)
बलात्कार करणारा, बलात्काऱ्याला मदत करणारा, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान सत्कार करणारा, बेताल वक्तव्य करणारा, हिंसा करणारा हे सर्व एकच शिक्षेचे हक्कदार आहे. त्यामुळे ते कोणत्याही जबाबदार पदावर असेल त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांची तिथे राहण्याची पात्रता नसते. आणि पत्रात नसलेल्या लोकांना जबाबदार पदावर ठेवणे हे सर्वात जास्त धोकादायक आहे. पर्याय नाही म्हणून अश्या व्यक्तीला त्या पदावर ठेवले आहे असे म्हणत असाल, तर ते पद रिकामे राहिले तरी चालेल, पण चुकीची बेजबाबदार आणि पात्रता नसलेली व्यक्ती तिथे जायला नकोच. उलट जबाबदार आणि नैतिक मूल्य पाळणारे व्यक्ती तयार करणे व ते जबाबदार पदावर पाठवणे ही जबाबदार सामान्य नागरिकांची / सदस्यांची आहे.
शोषण / हिंसा कोणत्याही स्वरूपाचे असो, प्रत्यक्ष शोषण / हिंसा केलेले असो, शोषणाला / हिंसेला मदत केलेली असो तो गुन्हा आहे आणि शोषण किंवा हिंसा करण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे.
© स्वप्निल मानव
Comments
Post a Comment