माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
परवाचीच एक माणूसपणाचा बोध देणारी गोष्ट... संध्याकाळी ऑफिस सुटलं... पोटात कावळे ओरडत होते. म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊ म्हणून दिगंबर आणि मी बाहेर पडलो. एका पाणीपुरीच्या स्टाँलवर थांबलो. समोरून एक मुस्लिम समाजातील माणसाची अंत्ययात्रा येत होती. दुसऱ्या दिशेने दोन महिला कामावरून आपल्या घरी जात असाव्यात एकूणच त्यांच्या लगबगीमुळे समजत होते, पेहरावाणे त्या हिंदू धर्मातील असाव्यात अस वाटल. अंत्ययात्रा पाहून दोन्ही महिलांनी पटकन आपल्या पायातील चप्पल काढली आणि अंत्ययात्रेचे दर्शन घेतले, हळहळ व्यक्त करत काहीतरी एकमेकींमध्ये पुटपुटल्या आणि निघुन गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखद भाव दिसत होता, त्यांना त्या क्षणभर का होईना दुःख झालं होतं. खरंतर हा प्रसंग पाहून खूप छान वाटलं, अशिक्षित अडाणी असलेल्या त्या महिला त्यांना जातीच, धर्माच देणंघेणं नव्हतं, त्यांना तिथे एक माणूस म्हणून त्या व्यक्तिप्रती हळहळ वाटली. तो प्रसंग पाहिल्यावर प्रार्थनेच्या ओळी आठवल्या "माणसाने माणसाशी माणसासम वागणे" ते यापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही.
---स्वप्निल मानव
Shabdachi mandni khup Chan .. mast lihlay ☺️
ReplyDeleteधन्यवाद💐
DeleteNice
ReplyDeleteधन्यवाद😊
Delete