तू आणि मी....

प्रत्येक माणसाला राग येतो. कोणी व्यक्त करतो तर कोणी व्यक्त न करता सहन करतो. कारण आपल्याला ती माणसं हवी असतात. म्हणून एकाने रागावलं तर दुसऱ्याने शांत राहवं म्हणजे कोणत्याही नात्यामध्ये भांडण, टंटे होत नाहीत. एकाने समजून घेणे, सहन करणे गरजेचे आहे. मग ते नाते कौटुंबिक असो अथवा मैत्रीचे असो.

प्रत्येक नात्यात कधीना कधी गैसमज, वाद, भांडण होतातच. तेव्हा एकाने तरी माघार घेऊन, गंमतीत घेऊन, कमीपणा घ्यावाच लागतो. तरच ते नाते टिकून राहते. माणूस हा समूहाने राहणारा प्राणी आहे. तो भावनेचा भूकेला आहे. तो एकटा राहू शकत नाही. जसे माणसाला अन्न, वस्र, निवाराची गरज आहे तशीच चांगले नाते, चांगली मैत्री, चांगला विश्वासाचीही गरज आहे.

प्रत्येक व्यक्तीची बुद्धी, परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचे अनुभव, मिळालेली परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार प्रत्येकजण घडत जातो. त्याची समाजातील ठेवण ही त्यानुसार घडते. कोणी महिन्याला एक लाख रुपये कमवतो तर कोणी दिवसाला दोनशे रूपये मजूरी कमवतो. कोणी गडगंज श्रीमंत असतो तर कोणी गरीब. कोणाला जन्मतः सगळं मिळते तर कोणाला स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमवावं लागते. फरक फक्त एवढाच पडतो जो भरपूर कमवतो त्याच्या घरी महिन्याचा किराणा येतो, तर कमी कमवणा-याच्या घरी आठ दिवसाचा किराणा येतो. पण कोणीही उपाशी राहत नाही. उलट जो कमी कमवतो त्याला परिस्थितीची जास्त जाणीव राहते. कारण रिकामा खिसा, भूक त्याने सहन केली असते. दिवस तसेच रहात नाही पण परिस्थितीची जाणीव मात्र कायम रहाते.

आपण जर कोणावर जीवापाड प्रेम, मैत्री केली असेल तर ते प्रेम, मैत्री निभावता आली पाहीजे. चांगले प्रेम मैत्री फार कमी लोकांनाच मिळते. ज्यांना असे प्रेम, मैत्री मिळाली असेल तो जगात सर्वात श्रीमंत. त्याने काहीही झाले, तरी आपले प्रेम, मैत्री शेवटपर्यंत टिकवून ठेवायला हवी. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर आपल्या प्रेमाला, मैत्रीला समजून सांगावे व त्याला तीच गोष्ट पटत असेल तर मानण्या न मानण्याच त्याच स्वातंत्र्य त्याला द्यावं. पण प्रेम, मैत्री लगेच तोडू नये. एक घाव दोन तुकडे करु नये. असे केल्यास ना आपण सुखी होत ना समोरची व्यक्ती, एकमेकांना समजून घेण्यातच दोघांचे सुख असते.

जर आपल्याला कोणी समजून घेत असेल तर आपण जास्त भाव खाऊ नये. समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाचा, मैत्रीचा मान ठेवावा. आणि त्याच्याशी प्रेमाने, विश्वासाने राहवे. कारण कोणतही नातं निभावत असताना त्या नात्याची गरज दोघांनाही सारखीच असते किंवा असावी. मला तुझी गरज नाही असे वागू नये. समोरच्याचाही विचार करावा. त्यालाही मन आहे हे समजून घ्यावे. कोणत्याही नात्याच्या गाडीचे दोन्ही चाक सारखेच पाहिजे तरच गाडी नीट चालते. सगळं माझ्या मनासारखंच होईल असं गृहीत धरु नये. शेवटी दुसऱ्याला सुख देण्यातच आपल सुख असते हे समजून वागावे.  शेवटी तो ही माणूस आहे. त्याचीही सहनशीलता आहे हा विचार झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण वाईट असतात. प्रत्येकात काहीनकाही उपजत चांगले गुण असतात. कोणाचा आवाज मधूर तर कोणाचं लिखाण मनाला भावून टाकणारं, कोणाची चित्रकला चांगली... असे अनेक गुण  प्रत्येकात आहेत. प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याचे गुण आवडतात. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे गुण आवडत असतील तर त्या गुणांसह स्वीकारून अवगुणांना समोरच्याला न दुखावता शांततेत मुद्देसूद दूर करावं.

एवढेही करुन जर पुढची व्यक्ती मला तुझी गरजच नाही असे दाखवत असेल तर तिथे आपला नाईलाज होतो. अशा वेळी खूप समजूनही समजत नसेल तर आपण माघार घ्यावी. कोणावर जबरदस्ती करु नये. हे बरोबर आहे पण आपल्याला ती व्यक्ती इतकी हवी असते कि कळत नकळत आपण जबरदस्ती करतो. सहा महिने स्वतःला सावरणे कठीण असते शेवटी आपण खूप हारुन जातो. कोमेजून जातो. मग राहा बाबा सुखात असे बोलून  आपण आपल्या विश्वात जगावे. इतरही नात्यांचा विचार करावा.

पण कितीही केलं तरी आपण ज्याच्यावर प्रेम करतो, मैत्री करतो ती व्यक्ती आपण कधीच विसरु शकत नाही. रोज जसे झाडाला पाणी घालतो, तशी रोज आठवण येतेच. मग असा विचार येतो ती व्यक्ती आपल्या शिवाय राहू शकते मग आपण का नाही ? असे अनेक प्रश्न पडतात. म्हणून प्रेम, मैत्री करतांना विचार करावा. लगेच कोणाचा एक गुण आवडला म्हणून प्रेम, मैत्री करु नये. जीवनात याहीपेक्षा खूप काही करण्यासारखे असते फक्त आपल त्याकडे लक्ष नसते.

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात...
शेवटपर्यंत असणारी तुझीच साथ...
मैत्रीस अर्पण...

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...