येत्या काळात व्यवसायिक सामाजिक कार्यकर्त्या समोरील आव्हाने!!!
- covid-19 या महामारीचा अनुभव आपल्या सगळ्यांचा पहिलाच आहे, या लॉक डाउन चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, या परिस्थिती मध्ये आपण जिथे आहोत तिथे आपण प्रयत्नशील आहोत, झुंजतोय,
हातावरच पोट असलेल्या कुटुंबांना अन्न पुरवणं, वेश्या व्यवसायातील महिलांना मदत करणं, अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबांना आधार देतोय, आरोग्य क्षेत्रात देखील जमेल ती जबाबदारी उचलत आहोत, या परिस्थितीत खचलेल्या सर्व सामन्यासाठी समुपदेशन आपण करतोय, विविध ऑनलाइन चर्चा सत्र, वेबिनार आपण घेत आहोत.
अश्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या या इच्छाशक्तीला व जिद्दीला सलाम.
- खर पाहिलं तर ही झुंज आत्ता सुरू झालीय, कारण लॉक down नंतर मोठी आव्हान आपल्याला पेलवायची आहेत, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे, त्याची तयारी आत्तापासून करायला हवी आहे.
कुठल्या आव्हानांची शक्यता वाटते आहे
- आर्थिक संकट!! सर्वच वर्गातील माणसां समोर हे संकट उभं राहिल, एखादा वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी धरपडेल तर एखादा वर्ग भांडवली व्यवस्थेत टिकण्यासाठी प्रयत्न करेन. दारिद्र्याचे दुष्ट चक्र व त्या पाठोपाठ येणारे प्रश्न. बेरोजगारी, नैराश्य, व्यसन, कौटुंबिक हिंसाचार, भूकबळी, बालकामगार, बालविवाह, वेठबिगारी, मानवी व्यापार, लैंगिक शोषण, गुन्हेगारी इत्यादी...समस्या वाढण्याची शक्यता आहे.
- स्थलांतर!!! महामारी मुळे मानसिक आघात, आर्थिक संकट, भूक यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले, होत आहे, त्यामुळे शहरी आणि ग्रामीण आयुष्यावर याचा परिणाम होईल. रोजगार, मुलांचे शाळा गळतीचे प्रमाण वाढेल अशी ही शक्यता आहे.
- दुर्लक्षित घटकांचे प्रश्न!! शेतमजूर, बांधकाम मजूर, असंघटित कामगार, छोटे व्यवसायिक, औद्योगिक क्षेत्रातील मजूर, महिला, मुले, आर्थिक कमकुवत घटक, अल्प भूधारक, बांधकाम मजूर इत्यादींचे जगण्याचे प्रश्न उभे होतील.
- आरोग्याच्या समस्या!!
मानसिक व शारीरिक आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उभे होतील असे वाटत आहे, आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण येईल.
- महिला व बालकांचे प्रश्न अधिक वाढतील अशी शक्यता आहे.
- कामगार संघटित किंवा असंघटित यांच्या जगण्यातील संघर्षात अधिक भर पडेल की काय अशी चिंता वाटत आहे
- प्रशासन व सर्वसामान्य यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. सर्व सामान्यच शोषण प्रशासन, यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे.
- या काही समस्याचाच उल्लेख इथे केला अश्या अनेक समस्या आपल्या समोर उभे राहणार आहेत, त्यात बालके व महिला अधिक दुर्लक्षित होत जातील अशी भीती आहे. म्हणून व्यवसायिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला काही तयारी आत्ता पासून करायला हवी आहे.
सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांची भूमिका-
- कार्यकर्त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, भविष्यात आपण याला तोंड देणार म्हणजे कोणती नीती वापरणार याची आखणी करणे गरजेचे,
- समाजाच्या गरजांचा क्रम बदलेल अस वाटतं,,, तर त्यांच्या गरजा व प्राधान्यक्रम पाहून आपल्या कामाच्या दिशा ठरवावा लागतील,
- सेवा, कल्याणकारी विकासात्मक, Right base दृष्टीकोना तुन सर्वच पातळीवर उतरून कार्यक्रमांची आखणी करावी लागेल.
- सामाजिक संस्था व कार्यकर्ते याना आपल्या कामाच्या कक्षा रुंद कराव्या लागतील. आपल्या पूर्वीच्या ध्येय धोरणाला चिटकून बसने उपयोगी नाही ठरणार, त्याची नव्याने मांडणी करावी लागेल.
- त्यासाठी एकट्याने नाही तर एकत्र येऊन, कार्यकर्ते व संस्थांचे जाळे निर्माण करावे लागेल. छोट्या गटा गटात न राहता संघटित प्रयत्न अपेक्षित आहेत,
- कारण आर्थिक संकट सामाजिक संस्थांसाठी देखील एक आव्हान आहे. संस्थांना मिळणार निधी यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सामाजिक संस्था मध्ये देखील रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो...त्यामुळे एकत्र यायची व आधाराला उभं राहण्याची गरज आहे, कारण कार्यकर्ते व संस्था उभ्या राहिल्या तर येणाऱ्या संकटाला तोंड देऊ शकता येईल.
चला मग विश्लेषण करूयात, नीती व धोरणे आखुयात, संघटना बांधणी करूयात.
वरील विषया बाबत एकत्र येऊन काय करता येईल!?? नक्की सुचवा. मिळून प्रयत्न करूयात.
तयारी ला लागुयात पुढच्या लढाईसाठी!!!!
-© दिगंबर बिराजदार, सामाजिक कार्यकर्ता
Comments
Post a Comment