बाकी विराज जगतापच्या न्यायासाठी कटिबद्ध राहुयात...
गेल्या काही दिवस सोशल मीडियावर खास करून टिकटॉकसारख्या भिकार माध्यमावर जो काही निचपणा चालला आहे तो थांबला पाहिजे..
कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विभूती लाभलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार घडण अतिशय लज्जास्पद आहे..
प्रबोधनाचा एक मोठा टप्पा अजूनही आपल्याला गाठायचा बाकी आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे..
ह्या दोनही महापुरुषांनी स्त्रियांचा सन्मान राखला आहे..मग ती स्त्री कुठल्याही समाजाची असो..एक नवा आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवला असतानाही त्यांच्या मूळ शिकवणीला बाजूला ठेवून काही समाजकंटक #मराठा-बौद्ध असा वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे..ह्या षडयंत्राची कल्पना फार लवकर आम्हाला झाली होती..म्हणूनच सुरवातीला एक पोस्ट आम्ही टाकली होती..जी आज खरी होताना दिसत आहे.
असे प्रयत्न जे कोणी करत असेल त्या (दोन्ही बाजूच्या) नीच प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत...
पुन्हा एकदा सजगपणे काम करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांना आवाहन आहे त्यांनी पुढे याव..
आग लावणाऱ्या लोकांपासून समाजाला वाचवाव..
अन्यथा हा भडका उडायला वेळ लागणार नाही...
(स्त्री मग ती कोणत्याही जातीतील/धर्मातील/ असो तिची बदनामी महाराष्ट्रात होता कामा नये..)
बाकी विराज जगतापच्या न्यायासाठी कटिबद्ध राहुयात..
टीप- सोबतच आठवडाभरापूर्वी केलेल्या आवाहनाची पोष्ट जोडत आहे...
जय शिवराय जय भीम
M Rashid
Mangesh Radhu Nikam
Swapnil Manav
Rakesh Pawar
Samadhan Sharad Bagul
Rohit Dhale
Comments
Post a Comment