भारत_देश_सार्वभौम_आहे

#भारत_देश_सार्वभौम_आहे. 

आपला भारत देश हा #सार्वभौम आहे. म्हणजेच आपल्या देशावर कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत शक्तीच वर्चस्व नसणे. मग एक व्यक्तीच असो, संस्थेचं असो, संघटनेचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, जातीचे असो किंवा पक्षाचे असो असे अश्या कोणत्याही एका शक्तीच वर्चस्व नसणे म्हणजे #सार्वभौम असणे. त्यामुळे भारत देशात किंवा महाराष्ट्रात सरकारमध्ये कोणताही पक्ष निवडून गेला तर त्याची ओळख पक्ष न राहता संबंधित राज्याचे सरकार म्हणून होते. 

खर तर केंद्रातील सरकारला मोदी सरकार हे नाव मेडियाने दिल आहे. आणि त्याचा इतका प्रभाव सामान्य जनतेवरच नाही तर आपल्यासारख्या परिवर्तनवादी लोकांवरही तो झाला आहे. आपण *सार्वभौम* भारत घडण्यासाठी सर्वजण लढतो आहे. आपल्या देशाचे सरकार कुना एका व्यक्तीच्या नावाने, संस्थेच्या नावाने, संघटनेच्या नावाने, पक्षाच्या नावाने, धर्माच्या नावाने ओळखले जाणार नाही असं आपलं संविधान म्हणत. 

कोणताही मंत्री निवडून आल्यावर शपथ घेताना संविधान व त्यातील मूल्यांच पालन करेल अशी शपथ घेऊनच कारभाराला सुरुवात करतो. म्हणून आपण सर्वांनीच #भारत_सरकार किंवा #केंद्र_सरकार अस म्हणायला हवं.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार नसून #महाराष्ट्र_सरकार आहे.  त्याचबरोबर केंद्रात मोदी सरकार नसून #भारत_सरकार आहे.

कारण आपला भारत देश #सार्वभौम आहे.

© स्वप्निल मानव, संगमनेर

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...