वाचनातून भेटलेली माणसं

              "प्रश्न पुरुषभानाचे" हे पुस्तक वाचलं. गेल्या अनेक वर्षे चळवळीत काम करतो आहे. पण हे पुस्तक वाचलं आणि नव्याने खूप काही गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. लिंगभाव आणि संवेदनशीलता या विषयाचा अभ्यास आणि त्यानुसार आपलं जगणं घडवावं अस मला नेहमी वाटतं. समाज अजूनही स्त्री आणि पुरुष त्यांच्या अस्तित्वाला घेऊन अजूनही खूप एकांगी आहे. सामाज व्यवस्थेने अगदी सुरुवातीपासून तशी व्यवस्था पद्धतशीरपणे सुरू ठेवली आहे. माझा चळवळीशी संपर्क आल्यापासून या विषयावर काम करणाऱ्या खूप मित्र मैत्रिणींचा सहवास लाभला. हळूहळू या विषयावरचा संवाद आणि वाचन केलं. काही संकल्पना समजत गेल्या, त्या वैयक्तिक जीवनात त्यांचा अंमल करताना मात्र नातेसंबंधातून खूपदा टीकाही झाली, नावं ठेवली गेली, बिघडला आहे वगैरे वगैरे.... 
मला पुरुष म्हणून घडताना आजपर्यंत समाजाने शिकवलेल्या पारंपरिक मूल्यांचा विरोध करताना खूप अडचणी आल्या. पण जे मूल्ये स्त्री आणि पुरुषांना समान संधीची आणि दर्जाची समानता उपभोगण्याचा अवसर देईल असे मूल्ये मनात अगदी स्पष्ट झाल्याने मी मला बोलणाऱ्यांचा फारसा त्रास करून घेतला नाही. 
पुरुष म्हणून घडताना समाजाने माझ्यावर लादलेल्या गोष्टींचा अनेकदा विचार करायचो, खूप प्रश्न पडायचे. हे असंच का? तसेच का? या प्रश्नांची उत्तरे मात्र या पारंपरिक व्यवस्थेकडे नव्हते. यांची उत्तरे मागितली तर उलट गप्प बस तुला काय कळत या उत्तराखेरीज काहीच मिळत नव्हतं. 
           कोणतेही काम किंवा भावना, स्त्री आहे किंवा पुरुष आहे, म्हणून त्यांना वेगळी वागणूक किंवा संधी ही व्यवस्थाच मुळात मला पटत नसे. मी पुरुष आहे म्हणून काही गोष्टी मला करण्यासाठी काहीच अडचण नाही किंबहुना मी त्या केल्याचं पाहिजे आणि पुरुष आहे म्हणून काही गोष्टी मी करूच शकत नाही, ही व्यवस्था कधीच माणूस म्हणून एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. 
             माणूस जन्मला आल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या गोष्टी तो  करतो, त्यात त्याला संविधानाने दिलेल्या अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा समतोल राखून मुक्तपणे, निर्भयपणे उपभोगण्याची पूर्ण मुभा आहे. आर्थिक, राजकीय, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक, भावनिक, शारीरिक, लैगिंक अश्या सर्वच बाबतीत माणूस म्हणून मनसोक्त जगता यावं. 
           स्त्री चवळवळीमध्ये स्त्रियांनीच पुढार घरून काम करावं, हे मला पटत नाही, जस आपण आपल्या मित्राला त्याच्या अडचणीच्या काळात मदत करतो अगदी तितक्याच सहजतेने स्त्रियांच्या प्रश्नावर पुरुषांनी काम करणं गरजेचं आहे. एखादा पुरुष स्त्रियांच्या प्रश्नावर किंवा स्त्रीचळवळीत काम करत आहे असं दिसल्यास त्याला हिनवणारी माणसं ही खूप असतात. 
हे पुस्तक वाचताना मी माझ्या चळवळीतील प्रवास आणि या सर्व प्रश्नांना घरून जगत आलो ते सगळं डोळ्यासमोर हेत होत. माझ्या खूप साऱ्या अनुत्तरित काही प्रश्नांना उत्तरे मला या पुस्तकात मिळाली. आणि माणूस म्हणून जगताना माझ्या आयुष्यातील स्त्रियांसोबत काम करताना येणाऱ्या प्रश्नांना समोरे जाण्यासाठी देखील एक प्रेरणा मिळाली. आणि स्त्री पुरुष समतेच्या चळवळीतील अनेक विचारवंतांना ऐकत आलं...
मी नक्कीच माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना हे पुस्तक वाचण्यासाठी सजेस्ट करेल. 

पुस्तकांचे नाव:- प्रश्न पुरुषभानाचे
संपादक:- १. डॉ. गीताली वि. मं
२) मुकुंद किर्दत
३) डॉ. रवींद्र रु. पं.
४) हरीश सदानी

© स्वप्निल मानव
8483824990

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...