बाल संरक्षण: एक आव्हान

आज पुन्हा एकदा बाल संरक्षण हा विषय आपल्या सर्वांसाठी काळजीचा बनला आहे, देशभरातून घडणाऱ्या घटना अगदी मन सुन्न करणाऱ्या आहेत. म्हणून आपण देखील वेळीच आपल्या बालकांच्या सुरक्षेसाठी तयार असायला हवं. *बाल संरक्षण आणि पालकांची भूमिका* या विषयावर आज आपण सर्वांनी आपली समज वाढवली आहे. 
बऱ्याच वेळा पालकांना वाटते की आपले बालके सुरक्षित आहेत त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही परंतु आज फक्त मुलीचं नाही तर मुलगे देखील लैगिंक शोषणाचे बळी ठरत आहे. त्यामुळे आज सर्वच पालकांना जागरूक होण्याची गरज आहे. आपल्या बालकांसोबत लैगिंक विषयावर बोलायला बरेचसे पालक नको म्हणतात किंवा त्यांना काय त्याची गरज असे म्हणतात. पण आज जर बालकांसोबतचा संवाद पालकांनी वाढवला नाही तर असे बरेच बालके आहेत ते शोषण सहन करत राहतात पण कुठेही बोलत नाहीत. त्यामुळे आपल्या बालकांसोबत बोला बोलण्यासाठी आवश्यक माहिती नसेल तर ती या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून घ्या. कारण लैगिंक शोषणाचे फार दूरगामी परिणाम बालकांवर होत असतो. म्हणूनच बालकांनासुरक्षित वातावरण निर्माण करणारे ही सर्व मोठ्यांची जबाबदारी आहे. मुलांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व संस्थांनी *बाल संरक्षण धोरण* समजून घेऊन ते आपल्या शाळेत, संस्थेत लागू करायला हवे. तरच आपण बालकांना सुरक्षित भविष्य देऊ शकतो.
© स्वप्निल मानव, बाल हक्क कार्यकर्ता
संपर्क- ८४८३८३४९९०

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...