पितृसत्तेला सुरुंग देणारा निर्णय :- कलम ४९८ थोडक्यात आढावा
कलम 497 या कायद्यानुसार एखाद्या पुरुषाची बायको त्याच्या सामंतीशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तर हा गुन्हा समजला जायचा, यात तो पती स्वतःच्या पत्नीच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा ठरत होता. यात त्या दुसऱ्या पुरुषाला शिक्षा व्हायची परंतु यात स्रीला कुठलीही शिक्षा होत नव्हती तिचाही त्या लैंगिक संबंधात तितकाच सहभाग होता तरी सुद्धा तीला शिक्षा नव्हती.
ही झाली एक बाजू दूसरी बाजू म्हणजे जर एखाद्या पुरुषाने बायकोच्या सामंतीशिवाय दुसऱ्या स्रीसोबत लैंगिक संबंध ठेवले तर त्या बायकोला आपल्या नवऱ्याच्या विरोधात किंवा त्याच्या प्रियसीच्या विरोधात कोणतीही तक्रार करण्याची तरतूद किंवा अधिकार या कायद्यात नव्हता. त्यावरून हे सरळ समजत की हा कायदा फक्त पुरुषांसाठी बनवलेला आहे. स्री ही पुरुषाची मालमत्ता आहे असच या कायद्यातुन सरळ सरळ अर्थ निघतो. स्रीवर पुरुषाचा अंकुश राहावा हेच हेतु ठेवून हा कायदा पारित झाला होता अस समजत आहे. आणि या कायद्यानुसार फक्त पुरुषालाच शिक्षा होती स्त्रीला मात्र कुठलीही शिक्षा या कायद्यात नव्हती. यावरून हेही समजत की हा कायदा पुरुषांच्या हिताची देखील नाही. त्यामुळे हा कायदा स्री पुरुष समतेच्या विरुद्ध आहे हे सिद्ध होत आहे. व्यभिचार हा अपराध नाही पण अनैतिक आहे अस न्यायालयाने म्हटलं आहे. अश्या सबंधाना प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा रद्द केला नसून अन्यायकारक व विषमतेच्या फौजदारी तरतूदी रद्द करणे हाच हेतु आहे. आता स्री व पुरुष दोघांनाही दाद मागण्याचा अधिकार असेल.
पती हा पत्नीचा मालक नसेल तर जोड़ीदार असेल असे सांगून कायद्यातील पितृसत्ताक व्यवस्थेला खतपानी घालणारा भाग रद्द केला आहे. त्याच्यासोबत हा निर्णय समतेचा पुरस्कार करणारा आहे त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
काहींना अस वाटत असेल की किमान कायद्याच्या भीतीने तरी अनैतिक सबंधावरील प्रमाण कमी होत. तर मग प्रश्न हा निर्माण होतो सतत अविश्वास व संशय असणाऱ्या नात्यात कितपत सुख आहे. कोणतही नातं विश्वासावर आधारित असतं. कायद्याच्या साखळदंडांनी विश्वास पैदा करता येत नाही. नवरा बायको एकमेकांशी प्रामाणिक असतील तर त्यांना कुठल्या कायद्याची काही गरजच नाही. हा कायदा रद्द करून कुणालाही सवलत किंवा कुणावरही अन्याय केला नाहीये हे नीट समजून घेतले पाहिजे.
हा कायदा व त्याचे विविध बाजू अधिक सविस्तर समजून घेण्यासाठी खालील लिंकवरील चर्चा नक्की ऐका...
https://youtu.be/NkDwyF9jrxc
----©स्वप्निल मानव
Comments
Post a Comment