नात्यातील प्रेम आणि काळजी समजून न घेता नात्याचा होणारा खून

अस्वस्थ

       अस लहानपणापासून ऐकल होत की आई-वडील मुलांच्या चांगल्यासाठीच धड़पडत असतात, आपल्या मुलांसाठीच जगत असतात. पण आज दोन घटनांनी अस्वस्थ केल आहे. तेलंगानामधील ऑनर किलिंगची घटना ज्यात स्वतःच्या मुलाच आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर येत आहे. आज मुलीच्या सुखापेक्षा जातीधर्माचा अविर्भाव महत्वाचा वाटतो आहे. दूसरी घटना स्वतःच्या 9 वर्षाच्या मूलीवर एक बापच बलात्कार करतो. ही तर बाप नावाच्या पवित्र नात्याला काळींबा फासनारी गोष्ट आहे. कोणत्या नात्यावर विश्वास ठेवावा. एकीकडे आपल्या मुलीने आपल्याला न सांगता तीच्या आयुष्यातील निर्णय घेतला म्हणून ऑनर किलिंगचे प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या लैंगिक इच्छेसाठी स्वतःच्या चिमुरड़या मुलीवरच अत्याचार. ज्या मुलीला प्रेम, लैंगिकक्रीड़ा, आकर्षण यातल काहीही समजत नसतं. तरी देखील त्या इवल्याश्या चिमुरडीला या सगळ्याला समोरे जाव लागल. आज स्री स्वतःच्या कुटुंबातच सुरक्षित नाही.😔😔..

        अस सांगितल जात पालकांच मुलांवर प्रेम असतं, म्हणून ते मुलांच्या भल्यासाठीच काही गोष्टीच्या काळजीपोटी ते मुलांना अडवत असतात. मग प्रश्न पडतो की पालक मुलांसोबत बोलून चर्चा करून त्यांच्यासाठी काय भल्याच आहे किंवा काय नाही हे का ठरवत नाही. आपल्या सज्ञान मुलांसाठी काय हव काय नाही हे परस्परच ठरवून टाकतात. याच संवादाच्या अभावतुन अश्या ऑनर किलिंगच्या घटना घडतात. खुप वाईट वाटतं की इतक साध सोलुशन असून लोक इतका मोठा जीवघेणा खेळ का खेळतात. मूल आपल्या न सांगता त्यांच्या आयुष्यातील इतका महत्वाचा निर्णय घेतात यावर पालकांनी एकदा विचार नक्की करायला हवा. यातून एकच कारण समोर येत ते म्हणजे आपसातील संवादाचा अभाव. मग संवादासाठी तस पूरक वातावरण तुम्ही मुलांसोबत निर्माण नाही करू शकला. मूल चुकतात त्यांना ते नक्की लक्षात आनुन द्यायला हव पालकांनी पण हे सर्व करताना मुलांना तुम्हाला काही सांगायची भीती वाटेल किंवा धोक्याची चिन्ह दिसतील असा संवादाचा मार्ग टाळावा. तरच मुलांना पालकांच प्रेम समजेल आणि पालकांनाही मुलांच प्रेम समजेल.

#संवादी बनुया, प्रत्येक नात्यातील प्रेम समजून घेऊया...

- ©स्वप्निल मानव, संगमनेर (८४८३८३४९९०)

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...