#प्रतिक्रिया


           कधी कधी अती घाई करून चुकीचा समज करून जेव्हा व्यक्त होतो तेव्हा ती केवळ प्रतिक्रिया ठरते, केवळ काहीतरी गृहीत धरून प्रतिक्रिया केलेली असते ती फारशी विचारपूर्वक केलेली नसते त्यामुळे कधी कधी त्यातून आपल्याबद्दल समोरचा त्या प्रतिक्रियेवरून येणाऱ्या काळात धड़ा घेऊन एखाद्या मुद्द्यावर या माणसासोबत बोलयच की नाही याचा शंभरदा विचार करतो. त्यामुळे केवळ प्रतिक्रिया देऊन मोकळे होने म्हणजे आपल व्यक्तिमत्वावर मर्यादा घालण्यासारखच आहे. त्यामुळे घाई ही संवादातील अडथळा निर्माण होते. संवादासाठी पूरक वातावरण, वेळ, किंवा अन्य काही घटक नसतील तर अश्या वेळी मत बनवीने चुकीचे ठरते. त्यामुळे प्रतिक्रिया देताना घाई न करता, समजून उमजून जर व्यक्त झाल तर ती प्रतिक्रिया समोरच्याला विचार करायला भागही पाडु शकते व त्यातून काही चूकत असेल तर दोन्ही संवादकर्त्यांना त्यातून नवीन शिकायला भेटते.

----- ©स्वप्निल मानव

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...