कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना

            कामाच्या ठिकाणी कामासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी छोट्या गोष्टी की ज्याकडून बहुदा दुर्लक्ष होत. कर्मचाऱ्याला कामाची जितकी गरज असते तितकीच गरज कंपनीला ही असणं गरजेचं आहे. इथे श्रमविभागणी तत्वाचा वापर कंपनीने केला तर बहुतेक प्रश्न आपोआप सुटतात. पण बऱ्याच वेळा अस होत की उच्च व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीवर विचार करत असत, परंतु मध्यम स्थरावरील कर्मचारी की ज्यांची खुप महत्वाची भूमिका असते, उच्च व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधील. इथेच मध्यम स्थरावरील व्यवस्थापन आपल्या सोयीने रिपोर्टिंग करतात. त्यामुळे उच्च व्यवस्थापनाच्या कामाच्या ठिकाणी नेमकं काय घडत हे लक्षात येत नाही.ते या मधल्या दुवाव्यावरच विश्वास ठेवतात. आणि मग सोयीने वागणाऱ्यांचं फावत. आणि मग त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम कामावर होतो.
व्यवस्थापनाने विचार करून कंपनीच्या कामात व कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करणे गरजेचा आहे.
१. नोकरीच्या ठिकाणी जर ठरलेल्या वेळेच्या नंतर जर एम्प्लॉयीने अधिक काम करावं असं वाटत असेल तर ते करून घेताना नम्रपणे करून घ्यावे. एम्प्लॉयीला वेतन हे वेळेचं दिल जात, संबंधित वेळेत कामासाठी तो बांधील असतो. जर सोयीनुसार एम्प्लॉयीकडून अधिक काम अपेक्षित असेल तर नम्रतेने करून घ्यावं तो करतो.
२. कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा नवीन कर्मचारी घेतले जातात तेव्हा कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जात. त्या प्रशिक्षणाचे वेगवेगळे फॉर्म असतात/ प्रकार असतात. हे प्रशिक्षण कंपनीकडून कार्यालयीन वेळेत दिल जात. प्रशिक्षण हे अतिरिक्त वेळेत कोणतीच कंपनी देऊ शकत नाही.
---©स्वप्निल मानव

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...